चंद्रप्रभू स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साही वातावरणात संपन्न
- चंद्रप्रभू स्कूल’मध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन राष्ट्राभिमानी व उत्साही वातावरणात साकारला
संचार वृत्त
चंद्रप्रभू इंग्लिश मेडीयम स्कूल, नातेपुते येथे ७८’वा’ स्वातंत्र्य दिन राष्ट्राभिमानी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे संचालक श्री. महावीर मगनलाल गांधी हे सहकुटुंब उपस्थित होते. श्री. गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत ,ध्वजगीत आणि राज्यगीत गायन करून राष्ट्रीय झेंड्याला सलामी दिली. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र गांधी, व्हाईस चेअरमन डॉ. वर्धमान दोशी, गव्हर्निंग काऊन्सिल मेंबर श्री. बाहुबली चंकेश्र्वरा,डॉ. सागर गांधी, श्री.विरेंद्र डूडू , श्री.वैभव दोशी, श्री. मनीष दोशी मुख्यध्यापिका सौ. शितल ढोपे ,पूर्व प्राथमिक पर्यवेक्षिका सौ. पल्लवी कुलकर्णी सह विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्यध्यापिका शितल ढोपे मॅडम यांनी शाळेचा वार्षिक आढवा देताना दहवीच्या निकलाची उज्वल परंपरा सांगताना विवध उपक्रम, अबॅकसचा उज्वल निकाल, शैक्षणीक सहली, क्रीडा स्पर्धा , स्कॉलरशिप यांचा विस्तृत व सांगोपांग आढावा दिला. शालेय उपक्रमांना पालकांचे मिळणारे सहकार्य याविषयी पालकांचे आभार व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून विविध परीक्षेतील उज्ज्वल यशाचे श्रेय सर्व माझ्या मेहनती शिक्षक स्टाफला जात असल्याचे उदगार काढले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यानी इंग्रजी व मराठीतून राष्ट्रभक्तीपर अत्यंत प्रभावीपणे भाषणे केली. तर मुलींनी प्रेरणादायी गीतावर सुंदर नृत्याचा आविष्कार सादर केला. तसेच यावेळी इयत्ता- आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यानी शिस्तबध्द पध्दतीने संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देवून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. महावीर गांधी यांनी स्कूलची शैक्षणिक गुणवत्ता व उपक्रम यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषण करताना संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र गांधी यांनी “चंद्रप्रभू शाळा सातत्याने गुणवत्ता टिकवून वैशिट्यपूर्ण अभ्यासक्रम राबवत असल्याचे म्हंटले. तसेच आम्ही घेतलेल्या निर्णयांवर पालकांचा खूप विश्वास आहे. आजच्या कार्यक्रमातील पालकांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थीती हेच दर्शवत असल्याचे गौर उदगार त्यांनी काढले. पुढे बोलताना त्यांनी शाळेत राबवणाऱ्या विविध उप्रकम, स्पर्धा, गुणवत्ता आणि अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी पालक, शिक्षक स्टाफ आणि गव्हर्निंग कौन्सिलचे सदैव पाठबळ मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे पथसंचलन विकास सुळ तर सूत्रसंचालन योगिता गोरे, निता सुतार आणि फिरोज आतार यांनी केले. या कार्यक्रमाचा इतिवृत्तांत प्रशालेचे सहशिक्षक संजय वलेकर यांनी दिला.