solapur
बसवेश्वर गुळवे यांचे निधन

बसवेश्वर गुळवे यांचे निधन.
अकलूज ता.३० (प्रतिनिधी) अकलूज येथील वीरशैव लिंगायत समाजाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते बसवेश्वर (आबा) शिवमुर्ती गुळवे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.मृत्यूसमयी ते ७६ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,मुलगी,सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य त्रिंबक (तात्या) गुळवे यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या अंत्यविधीस सर्व थरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते