solapur

जय विजय शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी बाळू लोखंडे तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र लोहार

जय विजय शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी बाळू लोखंडे तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र लोहार

संचार वृत्त अपडेट 

अकलूज(प्रतिनीधी)जय विजय शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अकलूज या पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी बाळू बाबू लोखंडे तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र शांताराम लोहार यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाधव साहेब यांनी काम पाहिले.या खेळीमेळीच्या वातावरणातील निवड प्रक्रियेला जय विजय शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मिसाळ, मार्गदर्शक अशोकभाऊ रुपनवर, संघटनेचे जिल्ह्याचे नेते एकनाथ कदम,माजी चेअरमन दत्तात्रय गायकवाड, माजी व्हॉइस चेअरमन विजया गुडे – सरूडकर मॅडम , संघटनेचे मार्गदर्शक प्रशांत सरूडकर सर, सर्व संचालक – मधुकर यादव, दिलीप मुळे, कविता शेळके, सोमनाथ मिसाळ, बाबासाहेब चंदनशिवे, धनंजय पिसे, संतोष रुपनवर, बापू हाके, राजेश झेंडे, अशोक राजगुरू, बशीर मुलाणी,पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर मगर , जय विजय शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय अस्वरे ,जय विजय शिक्षक संघाच्या महिला आघाडी अध्यक्षा वनिता शिंदे मॅडम, संघटनेचे कार्याध्यक्ष हमीद मुलाणी व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीबद्दल नूतन चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नूतन चेअरमन व व्हॉइस चेअरमन यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button