भाजप शिक्षक आघाडी संघटनेच्या माढा लोकसभा संयोजक पदी सिद्धेश्वर कोरे

भाजप शिक्षक आघाडी संघटनेच्या माढा लोकसभा संयोजक पदी सिद्धेश्वर कोरे
संचार वृत्त अपडेट
माळीनगर (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी या संघटनेच्या माढा लोकसभा संयोजकपदी येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व जुनिअर कॉलेज माळीनगरचे क्रीडाशिक्षक सिद्धेश्वर बसवराज कोरे यांची निवड करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ.नारायण राजूरवार यांनी श्री.कोरे यांच्या निवडीचे पत्राद्वारे संघटनात्मक नियुक्ती देण्यात आली आहे.या निवडीबद्दल दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र गिरमे व सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे यांच्या हस्ते सिद्धेश्वर कोरे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेचे माजी प्राचार्य प्रकाश चवरे,प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार,शिक्षक राजीव देवकर,सुधीर देवळालीकर, वसंत आंबोडकर,रणजीत लोहार,स्वप्निल नागटिळक, जगन्नाथ कोळी,नाना भोंग, बाळासाहेब बेंद्रे आदी उपस्थित होते.