फिनिक्स इंग्लिश स्कूल (२५/४) लवंगमध्ये पालकसभा संपन्न
- अकलूज (प्रतिनिधी)दि.20
माळशिरस तालुक्यातील (२५/४) लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये चालू शैक्षणिक वर्षाची पालक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या प्रसंगी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या पालक संघ अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.पालक संघाच्या अध्यक्षपदी निलेश लक्षमन वाघ व उपाध्यक्षपदी महादेव मोहन कोळेकर तर महिलांमधून पालकसंघाच्या अध्यक्षपदी सौ.शीतल संतोष भुजबळ व उपाध्यक्षपदी सौ.माया अमोल कोळी यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना लहानपणापासून अभ्यासाची आवड निर्माण व्हायला हवी त्यासाठी शिक्षक आणि पालक दोघांनीही सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे. लिहिताना प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन करीत लेखन केले पाहिजे. यामुळेच केलेला अभ्यास स्मरणात राहतो.मुलांनी नुसती घोकमपट्टी करण्यापेक्षा अभ्यास समजून घेऊन मनन व चिंतन केल्याने मुलांचे ज्ञान वाढते. यामुळे आभ्यासाविषयी व शाळेविषयी मुलांमध्ये गोडी निर्माण होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता गुलशन नशीब शेख व तमन्ना आशीब शेख यांनी विशेष प्रयत्न केले.या पालकसभे साठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.