पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर
- पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्नमाळशिरस तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
संचारवृत्त (प्रतिनिधी)
राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी माळशिरस तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्याही निवडी जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शासकीय विश्रामगृह अकलूज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये गेली दोन वर्षापासून पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सत्तेत कोठेही वाटा मिळालेला नाही त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करून त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्याचे ठरले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मागणी मान्य न केल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माळशिरस विधानसभा स्वबळावर लढविण्याबाबत सर्व पदाधिकारी भीमसैनिकांमध्ये एकमत होऊन भावी आमदार सोमनाथ भोसले यांचा विजय असो च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे व अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
नवीन पदाधिकारी निवडीमध्ये माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी पांडुरंग चव्हाण तालुका संघटकपदी तांबवे येथील राजू जाधव तालुका उपकार्याध्यक्षपदी निमगाव मगराचे येथील अनिल तोरणे तालुका सह सरचिटणीसपदी निमगाव मगराचे येथील विकास तोरणे लवंग येथील समाधान मदने यांची तालुका युवक सहसरचिटणीसपदी लवंग येथील मल्हारी चव्हाण यांची तालुका युवक खजिनदारपदी महाळुंग येथील समाधान चव्हाण यांची युवक तालुका सह संपर्कप्रमुखपदी तर अकलूज शहर खजिनदारपदी शिवाजी कांबळे यांच्या निवडी करून महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका खजिनदार विश्वास उघाडे तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सह संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड अकलूज शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी अनिकेत शिंदे सागर कोळी दयानंद कांबळे अर्जुन कोळी समाधान गेजगे किशोर गेजगे केशव केंगार गौरव पवार अनिल तोरणे विकास तोरणे शंकर गेजगे गणेश गुजले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.