लाडक्या बहिणींच्या सेवेसाठी लवंग ग्रामपंचायतीची तत्पर सेवा
मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणींच्या सेवेसाठी लवंग ग्रामपंचायतीची तत्पर सेवा
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील लवंग ग्रामपंचायतीच्या वतीने लाडकी बहीण योजने अर्ज करण्यासाठीची महिलांची होणारी धावपळ व आर्थिक लूट थांबविण्यासाठी मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.हे शिबीर लवंग विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.या शिबीराला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत.लाडक्या बहीणीनी गडबड व गोंधळ न सर्वांनी शांततेत अर्ज भरला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली आहे.या योजनेत महिला वर्गातून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खूपच पळापळ होत होती.अर्ज कुठे व कसा भरायचे हे माहित नव्हते.त्याच बरोबर त्यांची ऑनलाईन सेवा अर्ज भरण्यासाठी अर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. त्यामुळे लवंग ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य व कर्मचारी वर्ग यांनी गावातील महिलांसाठी मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेचे मोफत ऑनलाईन अर्ज करण्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये गावातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणात अर्ज नोंदणी केली.या शिबीरामुळे मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी आपला अर्ज भरून आनंदाने घरी गेल्या
हे शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी लवंग गावचे सरपंच प्रशांत पाटील,उपसरपंच प्रशांत भिलारे,पोलिस पाटील विक्रम भोसले,ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज वाघ,सज्जन दुरापे, सिताराम वाघ,मोहन कांबळे ग्रामसेवक मोहन मिटकल, कोतवाल बाळासो सरवदे,प्रकाश गायकवाड,ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी सहभाग घेतला होता.