माळीनगर ते टेंभुर्णी बस सेवा चालू करा युवा सेनेची मागणी
विद्यार्थ्यांसाठी माळीनगर ते टेंभुर्णी बस सेवा चालू करा युवा सेनेची मागणी–गणेश इंगळे
माळीनगर (प्रतिनिधी)
माळीनगर ते टेम्बुर्णी शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सेवा चालू करण्याची मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने अकलूजचे आगार प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्याकडे निवेदना मार्फत केली .यावेळी ओम पराडे रोहित इंगळे तृप्ती इंगळे साक्षी इंगळे हर्षदा पराडे सायली पराडे उपस्थितीत होते .
माळीनगर ते टेम्बुर्णी ही बस सायंकाळी 5 वाजता माळीनगर वरून चालू करावी माळीनगर येथे टेम्बुर्णी खुळे वस्ती मस्के वस्ती शेवरे संगम जांभूळबेट गणेशगांव लवंग सेक्शन पंचवीस चार पायरी पूल दोन नंबर गट तांबवे पाटी या गावावरून शेकडो विद्यार्थी हे माळीनगर येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात .त्यांची शाळा 4 :30 वाजता सुटते .त्यांना घरी जाण्यासाठी अकलूज वरून बस माळीनगर मार्गे असतात परंतु अकलूज वरून ही शेकडो विद्यार्थी ह्या सर्व गावातील असल्या मुळे माळीनगर येथील शाळकरी मुलांना बस मध्ये जागा नसते त्यामुळे मुलांना तासन तास ताटकळत बसावे लागते .रोज मुलांना घरी पोहचण्यासाठी सात ते आठ वाजत आहेत .विद्यार्थी हा देशाचा कणा आहे जर विधार्थ्यांना घरी पोहचण्यास सात आणी आठ वाजत असतील तर त्यांनी घरी जाऊन जेवण कधी करायचं आणी अभ्यास कधी करायचा हा मोठा प्रश्नन आहे तरी या सर्व बाबीचा विचार करता माळीनगर ते टेम्बुर्णी सायंकाळी 5 वाजताची बस सेवा शनिवार आणी रविवार आणी शासकीय सुट्टी सोडून इतर दिवशी चालू करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली अन्यथा सोमवार दि 29 जुलै 2024 रोजी माळीनगर येथे सायंकाळी 5 वाजता रस्ता रोखो करण्यात येईल असाही ईशारा देण्यात आला आहे .