solapur

अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळींबाला प्रति किलो 261/-रुपयाचा उच्चांकी दर

अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळींबाला प्रति किलो २६१/- रूपयाचा उच्चांकी दर

डाळींब उत्पादकांना पुन्हा सोन्याचे दिवस

अकलूज (प्रतिनिधी) डाळींब उत्पादक शेतक-यांना अकलूज डाळींब मार्केटमध्ये प्रविण निकम रा.डोंबाळवाडी याच्या डाळींबीला शिवशंभू फ्रुट कंपनी चा. ज्ञानदेव कुंडलीक कोकरे यांच्या अडत दुकानी प्रति किलो २६१ रूपये दर मिळालेने शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसापुर्वी उत्तम प्रतिच्या डाळींबीला १०० ते १५० रूपये दर मिळत होता. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतक-यांना मापक नफा मिळत होता.

अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीने परिसरातील शेतक-याची अडचन ओळखून मा.श्री. विजयसिंह मोहिते-पाटीलसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली डाळींब मार्केटची उभारणी केली त्यामुळे पंढरपूर, इंदापूर, माढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

आपल्या परिसरातील डाळींब वाहतूकीचा मोठा खर्च शेतक-यांना पर जिल्हातील मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविणेकरीता शेतक-यांना मोठा खर्च करावा लागत होता परंतू अकलूज बाजार समितीमध्ये डाळींब मार्कट सुरू झाल्याने डाळींब उत्पादक शेतक-यांना त्याचा फायदा होत आहे. रोख पेमेंट संगणकीय पावती वाजवी दर तसेच शेतक-यांची फसवणूक होवू नये म्हणून बाजार समितीचे विषेश लक्ष असते. यामूळे अकलूज डाळींब मार्केटवरची आवकेत दिवसें दिवस वाढ होत आहे.

शेतकरी वर्गाचा अकलूज बाजार समितीमध्ये डाळींब मार्केटमध्ये विक्रीसाठी डाळींब घेवून येण्याचा मोठ्या प्रमाणआवर कल आहे. त्यामुळे अकलूज डाळींब मार्केटमध्ये प्रति दिवस सुमारे ४००० ते ४५०० हजार क्रेटची आवक सद्या होत आहे. आशी माहिती बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील व सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button