वीर धरणातून नीरा नदी मध्ये केव्हाही पाणी सोडले जणार
वीर धरणातून नीरा नदीमध्ये केव्हाही पाणी सोडले जाणार
अकलूज (प्रतिनिधी) नीरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. वीर धरणाची पाणी पातळी आज 24 रोजी सायंकाळी 5 वाजता 577.69 मीटर व उपयुक्त पाणीसाठा 7.132 टीएमसी इतका असून धरण 75.80 टक्के भरले आहे. नीरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणे भरली की धरणातील विसर्ग किंवा या धरणाच्या पुढे पडलेल्या पावसाचे पाणी वीर धरणात येते. या धरणावरून पाण्याचे संतुलन सांभाळले जाते. त्या दृष्टीने वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणा मधून येत्या 48 तासात नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल असा तातडीचा संदेश निरा उजवा कालवा फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी एक उपविभागी अभियंता व वीर, फलटण, माळशिरस, माचणूर व पंढरपूर या सर्व शाखांच्या शाखाधिकार्या यांना दिला आहे. नीरा नदीकाठच्या लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन प्रत्येकाने आपल्या स्तरावर घेण्यात यावे असे कालवा तार क्रमांक 135 ने सुचित करण्यात येऊन त्याबाबत सातारा, सोलापूरचे जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ, अधीक्षक अभियंता व प्रशासक सोलापूर, वाई, फलटण, माळशिरस, पंढरपूरचे सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांना तातडीने माहितीस्तव कळविण्यात आल्याची कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले.
आज सायंकाळी पाच वाजता पाणीसाठा पुढील प्रमाणे
भाटघर 62.99 टक्के
नीरा देवघर 55.34
वीर 75.80
गुंजवणी 67.63 टक्के
या चार धरणांमध्ये 1.463 टीएमसी पाण्याची आवक चालू आहे. सर्व धरणातील एकूण पाणीसाठा 63.98 टक्के झाला आहे.
गतवर्षी याच दिवशी तो 52.26 टक्के होता.
गुंजवणी धरणातून सायंकाळी सहा वाजता 1710 की क्युसेक्सचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वीर धरणातून निरा आणि उजवा कालव्याला खरीप पिकासाठी यापूर्वीच पाणी सोडण्यात आले आहे.