कोरोना काळात ज्यांचे उद्योग व्यवसाय बंद पडले त्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी
कोरोना काळात ज्यांचे उद्योग व्यवसाय बंद पडले त्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी
श्रीपूर(बी.टी.शिवशरण)
गेल्या चार वर्षापुर्वी कोरोनाचे महासंकट आले होते त्या काळात कोरोना वाढल्याने नागरिकांना घराबाहेर फिरणे सार्वजनिक वावर यावर पुर्ण निर्बंध शासनाने आणले होते त्यावेळी प्रत्येकाला आपला जीव वाचवणे महत्वाचे होते त्यामुळे गोरगरीब लोकांना उदरनिर्वाहासाठी बाहेर मोलमजुरी करण्यासाठी जाता येत नव्हते तसेच पतसंस्था राष्ट्रीयकृत बँकांनी कोरोना अगोदर लहान मोठ्या व्यावसायिक तसेच व्यापार दुकान चालवण्यासाठी कर्ज पुरवठा केला होता पण कोरोना मुळे अशा लोकांचे उद्योग व्यवसाय धंदे बंद पडले दुकानदारी संपुष्टात आली अशा लोकांचें तत्कालीन कालावधी मधील सर्व कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे कोरोना काळात ज्यांचे व्यवसाय धंदे बंद पडले त्यामुळे ते कर्जपुरवठा केलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज फेडू शकले नाहीत अशा कर्जदारांना राष्ट्रीयीकृत बँका वसुलीचा तगादा लावून नोटिसा कारवाया करुन त्रास देत आहेत तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल यांच्या कडे लेखी निवेदन देऊन कर्ज माफी करावी अशी विनंती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच बंद पडलेल्या दुकानदारांनी केली आहे यामध्ये बहुजन समाज मागासवर्गीय समाजातील अनेक लहान मोठे बंद पडलेले दुकानदार आहेत शासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना वसुलीचा तगादा लाऊ नये तसेच कोरोना काळात बंद पडलेल्या व्यावसायिक दुकानदार धंदे यांच्या साठी दिलेलं कर्ज माफ करावे त्यानुसार कर्जमाफी चा आदेश काढुन गोरगरीब बहुजन व मागासवर्गीय समाजांतील लोकांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे