शंकरराव मोहिते महाविद्यालयात महिला विषयक कायदे व्याख्यान संपन्न

शंकरराव मोहिते महाविद्यालयात महिला विषयक कायदे या विषयावरील व्याख्यान संपन्न
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंतर्गत तक्रार निवारण समिती, अँटी रॅगिंग समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला कायदेविषयक सल्ला’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट सौ.धनश्री रिसवडकर मॅडम यांना आमंत्रित करण्यात आले होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. के.टिळेकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते पाटील व कै.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे सौ.रिसवडकर मॅडम आपल्या भाषणात सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान या विषयी विचार मांडले. व त्यानंतर राज्यघटनेमध्ये महिलांविषयी असणाऱ्या कायद्यांची माहिती दिली. राज्यघटनेमध्ये अनेक कलमा पैकी त्यांनी कलम १४ ते ५० मधील सर्व कायदे उपस्थितांना सांगितले.यामध्ये महिलांना कामाच्या ठिकाणी संरक्षण कायदा,बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा, मिळकतीतील हक्क कायदा, हिंदू विवाह कायदा,विशेष विवाह कायदा,समान वेतन कायदा अशा अनेक कायद्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यासाठी शासनाने महिला आयोगाची देखील स्थापना केल्याचे सांगितले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.के. टिळेकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सांगितले की,नैतिकतेचे धडे हे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले पाहिजेत घरातून मिळणाऱ्या शिक्षणावरच मुले पुढे अनुकरण करत असतात केवळ महिलासाठीच विशेष कायदे आहेत असं नाही तर पुरुषांना देखील कायद्यांची माहिती असावी या उद्देशाने या कार्यक्रमाच्या आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे.
आपण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेता त्या ठिकाणी काही तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांनी प्रशासनास तशा पद्धतीची माहिती द्यावी.आम्ही त्याचे निराकरण करू असे आव्हान केले.त्यासाठी त्यांनी निर्भया पथक,विशाखा समिती, दामिनी पथक अशा समित्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.सतीश देवकर अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुख डॉ. दमयंती कांबळे सचिव डॉ.सविता सातपुते अँटी रॅगिंग समितीचे प्रमुख डॉ.चंकेश्वर लोंढे महाविद्यालयातील डॉ.अश्विनी रेळेकर सिनियर व ज्युनियर विभागातील सर्व महिला प्राध्यापिका महाविद्यालयाचे प्रबंधक राजेंद्र बामणे कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दमयंती कांबळे सूत्रसंचलन प्रा.स्मिता पाटील यांनी तर आभार डॉ.सविता सातपुते यांनी मानले.