solapur

तरुणांना कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात जीवन जगताना होणार ; शितलदेवी मोहिते पाटील

तरुणांना कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात जीवन जगताना होणार ; शितलदेवी मोहिते पाटील

संचार वृत अपडेट 

 ग्रामीण भागातील तरुणांना विविध कौशल्ये आत्मसात करता यावीत या उद्देशाने घेत असलेल्या या कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानांचा उपयोग भविष्यातील जीवन जगताना होणार असल्याचे मत शिवरत्नच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲन्ड टेक्नॉलॉजी आणि विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास योजने अंतर्गत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलग पाच दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात येणार असून त्याचा शुभारंभ शिवरत्न चे अध्यक्ष असे शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार, मधुमेह तज्ञ डॉक्टर निखिल आर्वे, सोलापूर विद्यापीठाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर तरीही अभिजीत जगताप, डॉक्टर विश्वनाथ आवड, प्रा. शिवदास शिंदे, अनिल जाधव, प्राचार्य मेरी सुमती आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ एम के इनामदार यांनी हृदयरोगाचे विविध प्रकार सांगत हृदयरोग कशामुळे होतो त्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
तर डॉक्टर निखील आर्वे यांनी मधुमेहाचे प्रकार मधुमेह होऊ नये यासाठी करावयाची उपाय योजना व झाल्यानंतर करावयाच्या विविध उपचार याबाबत मार्गदर्शन केले. सोलापूर विद्यापीठाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अभिजीत जगताप यांनी पॅरामेडिकल बाबत तर पुणे येथील नाडी फोंडेशन महिंद्रा प्राईडच्या मनोचिकत्सीक सॅाप्ट स्किल्स ट्रेनर मधुमीता पलानी सॅाप्ट स्किस्ल बाबत मार्गदर्शन केले

पाच दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत गुरुवार (ता.१८) रोजी -महिला बचत गट कौशल्य विकास संधी शुक्रवार (ता.१९) रोजी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्ये विकास व संधी, शनिवार (ता.२०) रोजी औद्योगिक क्षेत्र कौशल्य विकास संधी रविवार (ता.२१) रोजी राजकीय नेतृत्वामधील कौशल्य विकासाच्या संधी या विषयावर कार्यशाळा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button