उध्वव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.101रक्त दात्यांनी केले रक्तदान
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका पक्षाचे वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका व अकलूज शहर आणि शिव आरोग्य सेना यांचे वतीने अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिराचे तसेच कोलारी मेथड पद्धतीचे मसाज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि ३४७ लोकांनी मसाज शिबिराचा लाभ घेतला.
तालुका प्रमुख संतोष राऊत, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख उमेश जाधव, अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,शिव आरोग्य सेना तालुका समन्वयक संजय गुंड, समन्वयक दिपक बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले, माळशिरस तालुक्याचे भावी आमदार .उत्तमराव जानकर, भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते-पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच .किशोरसिंह माने-पाटिल, विकास सोसायटी चे चेअरमन .नितीन निंबाळकर यांनी या शिबिरास विशेष उपस्थिती लावली,या बरोबरच युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सोनु पराडे पाटील,शिवसेना माळशिरस तालुका उपप्रमुख निलेश कांबळे, मार्गदर्शक जेष्ठ शिवसैनिक पि. व्ही. कुलकर्णी माळीनगर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण डोईफोडे, पै, गोरख पवार, नागनाथ मगर ,सचिन कदम मैत्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) पदाधिकारी मोहसीन शेख, महाराष्ट्र कामगार सेनेचे अकलूज आगार प्रमुख बाळासाहेब सुर्यवंशी, विभाग प्रमुख दत्तात्रय काशिद,गटप्रमुख मिलिंद मोरे, गटप्रमुख रज्जाक मुलाणी,वेळापुर शहरप्रमुख आप्पा कांबळे,श्रीपुर शहरप्रमुख प्रविण शिंदे,विवेक देशमाने, चाकोरीचे सुरेश पाटील, शाखाप्रमुख गणेश काळे, लालासाहेब अडगळे, रणजित भोसले, उत्कर्ष शेटे, माळी साहेब, अमोल पनासे, अविनाश सोनवणे सागर जगदाळे, गोरख गोरड, जावेद बाबा शेख, नंदकुमार कांबळे, विद्याताई साळुंखे, आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.