माळीनगरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 55 प्रशिक्षणार्थींची निवड
माळीनगरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ५५ प्रशिक्षणार्थींची निवड.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळीनगर या संस्थेतील ५५ प्रशिक्षणार्थींची विविध नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींचा आज सत्कार करण्यात आला.दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित,औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळीनगर या संस्थेची स्थापना २००७ साली झालेली असून या संस्थेमधून जवळपास २५०० ते ३००० प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले आहे.तसेच यातील अनेक प्रशिक्षणार्थी नामांकित कंपनीत नोकरी करीत असून काही प्रशिक्षणार्थी स्वतःचा व्यवसाय करीत आहेत.
सन २०२३-२४ साली प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन त्यांना कॅम्पस इंटरव्यूद्वारे टाटा ऑटो कॉम,जीवाय बॅटरी प्रा.लिमिटेड रांजणगाव,कमीन्स इंडिया प्रा.लि. फलटण,क्रिएटिव्ह टूल्स अँड कॉम्पोनन्ट प्रा.लि.पियाजो प्रा.लि. बारामती या नामांकित कंपन्यांमध्ये आयटीआय मधील ५५ प्रशिक्षणार्थींची मुलाखतीद्वारे अप्रेंटिसशीपसाठी निवड केलेली आहे.या माळीनगरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचे संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक ॲड.सचिन बधे, पृथ्वीराज भोंगळे,प्राचार्य विराज बधे यांचे हस्ते प्रशिक्षणार्थींना जॉइनिंग लेटर व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन नितीन इनामके व संचालक ॲड.सचिन बधे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास मॉडेल हायस्कूलचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार,माजी प्राचार्य प्रकाश चवरे,ज्येष्ठ शिक्षक राजीव देवकर,उपप्राचार्य रितेश पांढरे किमान कौशल्याचे प्रशिक्षक उमेश मुळे आदी उपस्थित होते.
या सर्व प्रशिक्षणार्थींना विनायक सावळे, सुधाकर शिंदे (इलेक्ट्रिशियन),सतीश आडत, विठ्ठल पवार (मेकॅनिक मोटर व्हेईकल),नवनाथ लोखंडे,महादेव भोसले(फिटर),वेंकटेश दबडे (वेल्डर),अमर राठोळ,शब्बीर मनेरी,प्रतिभा पांढरे यांचे मार्गदर्शन लागले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सतीश आडत यांनी केले तर प्राचार्य विराज बधे यांनी आभार मानले.