विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोठे होण्याचे ध्येय ठेवले पाहिजे;अक्षय चव्हाण
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोठे होण्याचे ध्येय ठेवले पाहिजे;अक्षय चव्हाण
संचार वृत्त
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोठी होण्याचे ध्येय ठेवले पाहिजे पुढे सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केले पाहिजे.असे प्रतिपादन नवनिर्वाचित पी.एस.आय.पदी निवड झालेले अक्षय राजेंद्र चव्हाण यांनी केले.
बागेवाडी (ता.माळशिरस) येथील अक्षय चव्हाण यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाले नंतर बागेचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने नगरी सत्कार करण्यात आला.त्यावेळी बोलताना अक्षय चव्हाण म्हणाले कि,विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली पाहिजे.एम पी एस सी अभ्यास तसा कठीण आहे पण रोज अभ्यास केला तर यश हमखास मिळतेच.
त्यावेळी सत्कार राज्याचे माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहिते पाटील,जि.प.चे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, जयराज पंतसंस्थेचे चेअरमन शशिकांत माने पाटील,हंसराज माने पाटील,श्रीराज माने पाटील बागेचीवाडीचे सरपंच कृष्णराज माने पाटील,दादासाहेब भोसले जोतीराम कणसे,मंच्छिद्र साळूंखे, राघू शितोळे यांनी सत्कार केले.
अक्षय चव्हाणचे शिक्षण पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा चव्हाणवस्ती बागेवाडी तर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालय अकलुज येथे झाले तर उच्च शिक्षण नांदेड येथे झाले आहे.त्यांनी २०२२ साली एम पी एस सी चे परीक्षा दिली होती.त्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे.त्यामध्ये चव्हाण यांना नेत्रदिपक यश मिळाले.त्यांचे वडील हे शेत मजुर आहेत तर आई गृहिणी आहेत.अत्यंत प्रतिकुल परीस्थितीमध्ये शिक्षण घेवुन अक्षय यांनी यश खेचुन आणल्याने समाजाच्या विविध स्तरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.