प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने अकलूज येथे भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन
प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने अकलुज येथे भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन.
संचार वृत्त
अकलूज (प्रतिनीधी)शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी निमित्त व मा.श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व मा.श्री मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.
सन १९७८ पासून कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील (बाळदादा) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, बालक्रीडा स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, कुस्ती स्पर्धा याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दिवाळी फराळ रत्नाई मिठाई वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीरे असे अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याच पद्धतीने याही वर्षी रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. गतवर्षी राज्यातील मुंबई, उस्मानाबाद, पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा या भागातून ८० संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी भव्य अशी १,३५,००० रु.ची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास ४४०००/- द्वितीय क्रमांकास ३३०००/- तृतीय क्रमांकास २२०००/- चतुर्थ क्रमांकास ११०००/- तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या ४ संघास प्रत्येकी ५०००/- रु चे बक्षीस देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभागी संघास ५००/- रुपये अशी नाममात्र प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना मंडळाच्या वतीने मोफत भोजनाची सोय करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी ९८६०३३१७१७,९३२५२५२९९६,९४२०७८२३२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले यांनी केले आहे. यावेळी मंडळाचे सचिव बिभीषण जाधव, संचालक व सदस्य उपस्थित होते.