स्वातंत्र क्रांतीच्या सुरेल जयघोषात जिजामाता कन्या प्रशालेत समूह गीत गायन स्पर्धा संपन्न
स्वातंत्र्य क्रांतीच्या सुरेल जयघोषात जिजामाता कन्या प्रशालेत समुहगीत गायन स्पर्धा संपन्न.
संचार वृत्त
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)जुलमी ब्रिटिश राजवटीत पिळवटून निघालेल्या भारतीयांच्या असंतोषाचा भडका ८ ऑगस्ट १९४२ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे उडाला. गांधीजींनी “छोडो भारत”ची हाक दिली आणि देशात क्रांतीची लाट आली.म्हणूनच या ऐतिहासिक दिनाच्या स्मरणार्थ जिजामाता कन्या प्रशालला व कनिष्ठ महाविद्यालयात समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्रशालेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सभापती सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील व रत्नाई संकुलाच्या मार्गदर्शक कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थिनींच्या जिजाऊ, ताराराणी,सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी या चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थिनींनी हे राष्ट्र देवतांचे,जयोस्तुते जयोस्तुते,उठा राष्ट्रवीरहो,हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे,देश रंगीला,संदेसे आते है,वो देश मेरे,ये मेरे वतन के लोगो अशी एकापेक्षा एक रोमहर्षक देशभक्तीपर समुहगीते सादर केली आणि संपूर्ण वातावरणात राष्ट्रभावना जागविली.
या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे संस्थापक कै.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व अक्कासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर अमर जवान ज्योतीच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले प्रशालेचे संगीतशिक्षक शेलार सर व रत्नाई वाद्यवृंदातील विद्यार्थ्यिनींनी बहारदार स्वागतगीत सादर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता वाघ यांनी केले.कार्यक्रमाचे परीक्षण संगीत क्षेत्रातील जाणकार डॉ.मंगेश शिंदे आणि सुनील कांबळे यांनी केले.स्पर्धेत मराठी गीतांमध्ये प्रथम क्रमांक ताराराणी गटाच्या ‘उठा राष्ट्रवीरहो’ या गीताला मिळाला.तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई या गटांच्या ‘जयोस्तुते’ आणि ‘हे राष्ट्र देवतांचे’ या गीतांना मिळाला तर हिंदी गीतांमधे प्रथम क्रमांक अहिल्यादेवी गटाच्या ‘संदेशे आते है’ या गीताला तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे जिजाऊ आणि सावित्रीबाई गटाच्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ आणि ‘ देस रंगीला रंगीला’ या गीतांना मिळाला. यावेळी प्रमुख अतिथी वाहन निरीक्षक अश्विनी जगताप यांनी या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.विद्यार्थिनींनी ड्रेपरीपासून, संगीत,वादन,गायन आदि सर्वच बाबतीत अत्यंत बारकाईने तयारी करून उत्कृष्ट सादरीकरण केले. जीवनाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कलेचे अनन्य साधारण महत्त्व असून विद्यार्थिनींना या सर्व उपक्रमांचा आयुष्यात दुरगामी लाभ होणार आहे असेही त्या पुढे म्हणाल्या.या कार्यक्रमला प्रशालेच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या सौ नयना शहा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.याप्रसंगी सौ मनीषा चव्हाण,स.पो.नि. किरण पावसे,शिवाजी कांबळे आदी मान्यवरांसह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.पी.भोसले आणि सौ.एस. जी.खराडे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रशालेचे पर्यवेक्षक वाय. के.माने देशमुख यांनी केले. परिक्षक डॉ.मंगेश शिंदे यांनी याप्रसंगी देशभक्तीपर अप्रतिम गायन सादर केले.शेवटी ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.