ओंकारचा वजन काटा तंतोतंत वजनाच्या विश्वासार्हतेवर शिक्का मोर्तब

ओंकारचा वजन काटा तंतोतंत वजनाच्या विश्वासार्हतेवर शिक्का मोर्तब
संचार वृत्त अपडेट
ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील 202५ व 202६ या सिझन मधील वजन काटा तपासणी भरारी पथकातील वैधमापन आधिकारी पुणे यांनी अचानक वजनकाट्याची पाहणी करून ऊसाने भरलेले व रिकाम्या वाहनाचे वजन काट्यावर सर्वांच्या समक्ष तपासणी केली निरिक्षक वैध मापन आधिकारी पुणे दि . कि शेजवळ नि. प्र.उदमले यांनी वजन काटा तंतोतंत असल्याचे प्रमाण पञ देण्यात आले.
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी सर्व युनिटवर ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ करताना ऊसाचे वजन शेतकऱ्यांनी कोणत्याही काट्यावरून करून आणा असे जाहीर सांगितले होते तो शब्द खरा ठरला विश्वासार्हतेवर शिक्का मोर्तब झाला या वेळी वाहन चालक कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना ऊस दराबाबत व वजन काट्याबाबत दिलेला शब्द खरे करणारे चेअरमन (ऊस उत्पादक शेतकरी महादेव शेळके पाटील)



