अकलूज नगरपरिषद निवडणुकीत भाजपने युतीचा धर्म न पाळल्यास वेगळा विचार करावा लागेल —-के डी धाईंजे

अकलूज नगरपरिषद निवडणुकीत भाजपने युतीचा धर्म न पाळल्यास वेगळा विचार करावा लागेल —-के डी धाईंजे
प्रदेश युवक उपाध्यक्ष आरपीआय
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगरपरिषद निवडणुकीत भाजप बरोबर आरपीआय आठवले गट युती आहे मात्र माळशिरस तालुक्यात भाजपने युतीचा धर्म पाळताना आरपीआयला अंधारात ठेऊन त्यांच्या जागा अगोदरच नक्की केल्या आहेत व अकलूज मध्ये आरपीआयला दोन जागा दिल्या आहेत एक जागा जनरल मध्ये व एक जागा जिथे आरपीआयचे मतदान कमी आहे अशी जागा सोडली आहे त्यामुळे आरपीआयचे गोटात याबाबत प्रचंड नाराजी असल्याचे आरपीआयचे प्रदेश युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष के डी धाईंजे यांनी म्हटले आहे भाजपने युतीचा धर्म पाळताना आरपीआयला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे होते असे त्यांनी म्हटले आहे के डी धाईंजे यांनी भाजप बदल नाराजी व्यक्त करतांना म्हटले आहे की अकलूज मध्ये आरपीआयची ज्या वार्डात मोठी ताकद आहे तेथे आरपीआयला जागा सोडली नाही त्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत भाजपच्या या भुमिके बाबत आरपीआयचे वरिष्ठ नेते पदाधिकारी यांचे कडे बोलणार असल्याचे धाईंजे यांनी सांगितले आहे आरपीआय आठवले गट व भाजप यांची निवडणुकीत युती आहे हा विचार माळशिरस तालुक्यात भाजपचे सुत्रांनी करायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे



