सुधाकर कांबळे सर यांनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आदर युक्त दरारा निर्माण केला आहे
सुधाकर कांबळे सर यांनी कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आदरयुक्त दरारा निर्माण केला आहे
श्रीपूर(बी.टी.शिवशरण)
ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे असे वाटते पण तसे चरण असणारे सर्वगुणसंपन्न आदर्श माणसं राहिली आहेत का हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे कुठं अंधार तर कुठं अज्ञान असं म्हटलं जातं पण सगळीकडे तसेच आहे असे नाही वाळवंटात झरा सापडला म्हणजे जो आनंद अवर्णनीय असतो तसं काही परिसरात काही गावात काही चांगली माणसं आहेत म्हणून तेथे चांगल्या बाबी चांगल्या गोष्टी घडत आहेत तद्वत असेच एक सुंदर उदाहरण श्रीपूर मधील श्री चंद्रशेखर विद्यालय नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयात भुगोल चे शिक्षक श्री सुधाकर शिवाय कांबळे सर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे देता येईल कडक शिस्तीचा विद्यार्थी वर्गात आदरयुक्त त्यांचा दबदबा आहे म्हटले तर वावगे होणार नाही हरहुन्नरी व्यक्तिमत्व चतुरस्त्र स्वभाव सतत नाविण्यपूर्ण विकासात्मक कामांचा ध्यास घेतलेले कांबळे सर पांडूरंगाचा सावळा कलर असलेले आहेत पण ते जिथे लक्ष घालतील तेथे सुवर्ण क्षण निर्माण करतील ते पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावचे रहिवासी आहेत त्यांचं शिक्षण एम ए बी एड बीपीएड असून ते महाविद्यालयात भुगोल विषयाचे सहशिक्षक आहेत भारत गाईड चळवळीमुळे त्यांनी सहभाग घेतला असतो रोवर लीडर म्हणून गेली बारा वर्षे सोलापूर जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावत आहेत सोलापूर जिल्हा पहिलं कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर स्काऊट गाईड रोवर पथक स्थापन केले आहे तसेच त्यांनी सांगली येथे आलेल्या कृष्णा नदीच्या पुराने त्या भागात जनजीवन विस्कळित झाले होते त्यावेळी रोवर कृचे माध्यमातून सांगली जिल्ह्यातील बहे बोरगाव या गावाला जवळ जवळ पंचवीस ते तीस हजार रुपये किंमतीची जीवनावश्यक वस्तू व गृहोपयोगी साहित्य लोक सहभागातून वर्गणी जमा करून पोहचवण्यात आली प्रत्येक वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशी दरम्यान चंद्रभागा नदी स्वच्छता अभियान सक्रिय सहभाग असतो प्रत्येक वर्षी माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील दत्त मंदिरात जयंती निमित्त सेवा प्रकल्प राबविण्यात त्यांचा सहभाग असतो पंढरपूर येथे वृक्ष प्रेमी ग्रुप च्या माध्यमातून हजार वृक्ष लागवड केलेली आहे व त्याचे संगोपन करणे याची जबाबदारी संपूर्णपणे त्यांनी घेतली आहे शालेय क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना कब्बडी ज्युडो कुस्ती या खेळाचे मार्गदर्शन प्रोत्साहन देण्यासाठी ते विद्यार्थ्यांना स्पर्धेस घेऊन जाण्याची ते आवडीने जबाबदारी घेतात नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत त्याचे औचित्य साधून प्रशालेच्या परिसरात एकावन्न वृक्षांची लागवड केली आहे त्याचे संगोपन करण्याची पुर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आहे तसेच दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये विविधगुण दर्शन सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वैचारिक उपक्रम कार्यक्रम यात त्यांचा वावर सहभाग मोठा असतो ते शिक्षक म्हणून आदर्श आहेत विद्यार्थी वर्गात प्रिय आहेत पालक शिक्षक विद्यार्थी यांच्यात सुसंवाद समन्वय साधून शाळेत आनंदी वातावरण ते करतात उत्कृष्ट निवेदक आहेत त्यांच्यात एक चांगला कलाकार दडलेला आहे बुध्दी चातुर्य हजरजबाबी स्वभाव विनोदी वृत्ती यामुळे ते प्रशालेत कनिष्ठ महाविद्यालयात सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात अनेक घटना प्रसंग त्यांच्या विषयी लिहण्या सारखं बोलण्या सारखे खूप आहे विद्यार्थ्यांवर त्यांचा आदरयुक्त वचक राहिला आहे वाचन चिंतन व वैचारिक परिवर्तनवादी भुमिका असलेले सुसंस्कृत व्यक्तीमत्व असलेल्या विद्यार्थी प्रिय शिक्षक सुधाकर कांबळे सर यांना त्यांच्या विविध पैलू वर लिहित असताना त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरण पुर्वक हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा