solapur

माळीनगर येथील ग्रामस्थांचे बेमुदत लक्षणीक साखळी उपोषणास सुरुवात

माळीनगर येथील ग्रामस्थांचे बेमुदत लाक्षणीक (साखळी) उपोषणास सुरुवात.

संग्रामनगर  (प्रतिनिधी)
माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग गेलेला आहे.तेथील श्रीहरीनगर,नंदनगर येथे रस्ता काॅसींग कट पाॅईंट करून मिळण्यासाठी येथील रहिवासी यांनी आजपासून बेमुदत लाक्षणीक साखळी उपोषणास सुरुवात केली.यावेळी या परिसरातील नागरिक व महिला वर्गांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.

माळीनगर-श्रीहरीनगर येथुन श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग गेलेला आहे.या महामार्गावरती श्रीहरीनगर व नंदननगर या ठिकाणी रहात असलेल्या नागरिकांची रस्ता क्रॉसिंगसाठी कोणत्याच प्रकारची सोय उपलब्ध नसल्यामुळे येथील रहिवाशांना जवळ पास दोन-तीन किलोमीटर पुढे जाऊन माळीनगर येथील उडान पुलाच्या खालून परत हरीनगरला यावे लागते ऐवढा त्रास नागरिकांना रस्ता काॅसींग करण्यासाठी करावा लागत आहे.

हरीनगर परिसरात येथे सुमारे दहा हजार नागरिक रहात आहेत.पण पालखी महामार्गात रस्ता कट पाॅईंट नसल्यामुळे तेथील नागरिकांना रस्ता काॅस करताना दररोज तारेवरची लागत आहे.गेल्या अनेक दिवसांपासुन वरील कारणामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत.


हरीनगर या ठिकाणी नवीन ग्रामपंचायतीचे कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,माळीनगर-खंडाळीरोड,स्मशाणभुमी,दफनभुमी व शालेय विद्यार्थींची गैरसोय होत आहे.वरील गैरसोय दुर होण्यासाठी व श्रीहरीनगर,नंदननगर येथे रस्ता कट पाँईट करून मिळावा यासाठी माळीनगर ग्रामपंचायतीच्या सभेत बहुमतांने ठराव संमत केला आहे. माळीनगर ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाची प्रत व निवेदन प्रकल्प अधिकारी,श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग कार्यालय,पंढरपूर यांना समक्ष भेटुन दिले आहे व त्याचा पाठपुरावा ही सातत्याने केला आहे.वरील कार्यालयाने तक्रारीची दखल घेवु असे पोकळ आश्वासन दिले जाते पंरतु या कार्यालया कडून कसल्याही प्रकारची दखल व हालचाल होत नसल्यामुळे श्रीहरीनगर,नंदननगर येथील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मा.प्रांताधिकारी सो.अकलूज यांना देण्यात आले व तक्रारीची दखल घेण्याची विनंतीही केली पंरतु अद्यापपर्यंत वरील तक्रारीची जाणुन-बुजुन दखल घेतली गेली नाही त्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे.त्याचा परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचे नागरिकांनी ठरविले आहे व रस्ता कट पाँईटची मागणी जोपर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत संबंधीत प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात लाक्षणीक (साखळी) उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button