स्वखर्चाने यमाईदेवी मंदिरात सीसीटीव्ही वार्ड क्रमांक पाच मध्ये बोरवेल घेऊन पाण्याची सोय केली;भीमराव रेडे पाटील
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांनी स्वखर्चाने यमाई देवी मंदिरात सीसीटीव्ही व वार्ड क्रमांक पाच मध्ये बोअरवेल घेऊन पाण्याची सोय केली
श्रीपूर
बी.टी.शिवशरण मुख्य संपादक
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माढा विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार शिवतेज सिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन खाली महाळुंग येथील ग्रामदैवत श्री यमाई देवी मंदिर परिसरात व मंदिरात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तसेच वार्ड क्रमांक पाच मध्ये स्वखर्चाने बोअरवेल घेऊन त्यात पाण्याची मोटर टाकण्यात येऊन येथील रहिवासी यांची पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे या दोन सामाजिक व विधायक कार्याची दखल घेऊन महाळुंग श्रीपूर मधील नागरिकांनी उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत वार्ड क्रमांक पाच मध्ये गेली अनेक महिने तेथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती या संदर्भात तेथील रहिवासी यांनी नगरपंचायत कडे अनेकदा मागणी केली होती याची दखल घेऊन उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांनी स्वखर्चाने येथील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांनी सांगितले की काही दिवसांत सर्व भागांतील नागरिकांचे मुलभूत प्रश्न व विकासकामे करुन प्रलंबित समस्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माढा विधानसभा मतदारसंघ भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू