सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने अकलूज शहरातील वंचितांना कपडे व फराळाचे वाटप
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने अकलूज शहरातील वंचितांना कपडे व फराळाचे वाटप
संचार वृत्त अपडेट
अकलूज शहरातील गोरगरीब वंचित लोकांना सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नवीन कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने म्हणले की दिवाळी सण हा समाजातल्या गोरगरीब वंचित घटकांना आनंदाने साजरा करता आला पाहिजे यासाठी आम्ही नेहमी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार यांच्या मार्गदर्शनाखालील समाजातील गोरगरीब घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम आमच्या संघ संस्थेच्या वतीने नेहमी आम्ही प्रयत्न करत असतो समाजात जगत असताना प्रत्येकाला मानवी हक्क मानवाधिकार मिळाला पाहिजे यासाठी संपूर्ण भारतातील विविध राज्यांमध्ये आमचे सर्व पदाधिकारी काम करत असतात अकलूज शहर व माळशिरस तालुका टीम नेहमी सामाजिक विविध उपक्रम राबवत असते आज आम्ही दिवाळीसाठी कपडे व फराळ वाटपाचा कार्यक्रम ही समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केला व या संपूर्ण कार्यक्रमाचा बहुमान आणि जेष्ठ नागरिकांना देण्यात आला यावेळी पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने तालुका अध्यक्ष तानाजी वायदंडे विष्णू केंगार अध्यक्ष रोहित टेके संग्राम नगर विभाग तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व जेष्ठ नागरिक उपस्थित जेष्ठ नागरिक शरद पालखे सिकंदर तांबोळी बाळासाहेब कुलथे मोहन पालखी व आदी मान्यवर उपस्थित होते