solapur

आ.राम सातपुते यांच्या कडे लक्ष द्यावे;राजेंद्र गिरमे

गडकरी यांनी घेतली राजेंद्र गिरमे यांची भेट

संचार वृत्त अपडेट 

माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे यांच्या गोकुळ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

गडकरी यांनी राम सातपुते यांच्या अकलूज येथील प्रचारसभेला जाण्यापूर्वी रंजन गिरमे यांची आवर्जून सदिच्छा भेट घेतली. सध्या माळशिरस विधानसभेची निवडणूक चांगलीच गाजत असून भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अकलूज येथील विजय चौक येथे गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभास्थळी जाताना गडकरी यांनी राजेंद्र गिरमे यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिल्याने माळशिरस तालुक्यात चर्चा रंगू लागली आहे. माळीनगर कारखाना परिसर व पूर्व भाग येथे गिरमे यांना मानणारा मतदार असून तालुक्याच्या राजकारणामध्ये ओबीसीचे नेते म्हणून गिरमे यांना विशेष स्थान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती राजेंद्र गिरमे यांना केली आहे.

या भेटीदरम्यान माळीनगर परिसरातून जाणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात येत असलेल्या अडचणींबाबतचे निवेदन माळीनगर ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले. माळीनगर शहरांतर्गत ग्रामस्थांच्या सोयीसाठी महामार्गावर कट पॉईंट करण्यात यावेत, माळीनगर कारखान्याच्या केन यार्ड समोरील उड्डाणपुलाचे रखडलेले काम पूर्ण करावे, तसेच पालखी महामार्गाच्या निकृष्ट कार्यप्रणालीबद्दल तक्रार करण्यात आली. याप्रसंगी माळीनगर परिसरातील महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button