पिसेवाडी येथील ट्रांसफार्मर तात्काळ बसवावा:अजित बोरकर
पिसेवाडी येथील ट्रांसफार्मर तात्काळ बसवावा.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
संचार वृत्त अपडेट
प्रतिनिधी/पिसेवाडी येथील गेल्या दोन दिवसापासून जळालेल्या ट्रांसफार्मर मुळे शेतकऱ्यांचे गेल्या दोन दिवसापासून अतोनात नुकसान होत आहे.आता सध्या कांदा लागवड सुरू असून शेतकऱ्यांनी आणलेली कांद्याची रोपे जळून चाललेली आहेत. तसेच जनावरांना व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत.त्यामुळे या विषयाची महावितरण कार्यालयाने तात्काळ दखल घेऊन मोहिते वस्तीवरील ट्रांसफार्मर तात्काळ बसवावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयातच ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख नारायण बोराटे व स्वाभिमानी चे तेजस भाकरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अजित(भैय्या)बोरकर,अशोक पिसेवाडीचे युवा नेते सतीश पिसे, सागर सावंत, लालासाहेब वाघ, लक्ष्मण पिसे,विजय वाघंबरे,प्रदीप ठवरे-पाटील यासह पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.
ट्रान्सफॉर्मर बाबत आजच माझ्याकडे रिपोर्ट आलेला आहे डिव्हिजन कडे मागणी करून लवकरात लवकर उपलब्ध झाल्यास तात्काळ बसवण्यात येईल. संदीप डोळे उपअभियंता वेळापूर
ट्रांसफार्मर बाबत आजच माझ्याकडे रिपोर्ट आलेला आहे लवकरात लवकर डिव्हिजन कडून ट्रांसफार्मर मागणी करून उपलब्ध झाल्यावर तात्काळ बसविण्यात येईल. (संदीडोळे-उपअभियंता वेळापूर)