पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबनेचा निषेध
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबनेचा निषेध
संचार वृत्त अपडेट
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघु विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबन प्रकरणाच्या निषेधाचे निवेदन महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत दिले.
यावेळी निवेदनामध्ये परभणी येथील संविधान विटंबन प्रकरण अतिशय निंदनीय असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून नेहमीप्रमाणे तो माथेफिरू असल्याचे घोषित करण्यात आले आहे राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन सदर आरोपीचा कोणी मास्टरमाइंड आहे का किंवा कोणी हे कृत्य करून दंगलीचे षडयंत्र रचले आहे का याची सखोल चौकशी व तपास करून यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी तसेच परभणी येथील आंबेडकरी अनुयायांनी याचा निषेध नोंदविल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून येथील निरपराध महिला व पुरुषांवर अमानुषपणे लाठी हल्ला करून त्यांना जखमी करून त्यांचेवर गुन्हे दाखल केले आहेत या घटनेचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत यातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून भीमसैनिक व महिलांवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अन्यथा सदरच्या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नजीकच्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल व त्याची होईल ती जबाबदारी शासनावर राहील अशी मागणी करण्यात आली आहे
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी निषेध नोंदवून तीव्र प्रतिक्रिया दिल्या यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष विश्वास उगाडे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे युवक तालुकाध्यक्ष कबीर मुलानी तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे युवक तालुका सरचिटणीस ओमप्रकाश बडे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका युवक संघटक विकी लोंढे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका प्रसिद्धीप्रमुख संदीप तोरणे युवक संपर्कप्रमुख योगेश डावरे तालुका संघटक मिलिंद चव्हाण तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे शहर सरचिटणीस मन्सूर काझी विनोद सावंत महिला आघाडीच्या स्वाती धाईंजे मनीष ननवरे संतोष भोसले जय पाटील अलीम शेख आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.