solapur
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संतोष उघडे यांची शाखाधिकारी पदी निवड

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संतोष उघडे यांची शाखाधिकारी पदी निवड
संचार वृत्त अपडेट
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खंडाळी शाखेत लिपिक पदावर काम करीत असलेले संतोष कुमार उघडे यांचे मळवली शाखेत शाखाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ते 1997 पासून बँकेचे सेवेत लिपिक पदावर कार्यरत होते त्यांनी याआदी निमगाव,खुडूस, वेळापूर, बोंडले, खंडाळी या शाखेत काम केले आहे त्यांचे कामकाज पाहून वरिष्ठांनी त्यांची पदोन्नती केली. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले.
याच निमित्ताने त्यांचा खंडाळी शाखेत सन्मान करण्यात आला यावेळी खंडाळी शाखेचे शाखाधिकारी बी.आर.पवार, चेअरमन गेजगे, नामदेव पताळे, इंगोले देशमुख मॅडम, संतोष मोरे,अण्णा मोरे ई.मान्यवर उपस्थित होते.