प्रा.अर्जुन ओवाळ यांचा 61 व्या वाढदिवसानिमित्त माळीनगरच्या गोलमोहर प्रशालेत सत्कार संपन्न

प्रा.अर्जुन ओवाळ निर्भीड ज्येष्ठ पत्रकार यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त माळीनगरच्या गोलमोहर प्रशालेत सत्कार संपन्न
संचार वृत्त अपडेट
माळीनगर (प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील माळीनगरच्या गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये दि. २६ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त मराठी विषयाताचे आदर्श शिक्षक निर्भीड जेष्ठ पत्रकार प्रा.अर्जुन ओवाळ यांचा सत्कार प्राचार्य श्री वसंत आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कारानंतर प्रा अर्जुन ओवाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तत्कालीन संस्थेचे सचिव रंजन भाऊ गिरमे यांनी माझी नेमणूक केली. माझी शिफारस मुख्याध्यापक राऊत व इंग्लिश विषयाचे दिलिप सर यांनी केली.
पंचवीस वर्षे काम करत असताना संगीत विभागाचे काम केले. शासकीय योजनाचा फायदा विद्यार्थांना, शाळेला, संस्थेला करून दिला आहे.
पत्रकारिता करताना जनहिताच्या बातम्या दिल्या आहेत व त्याची दखल घेतली आहे