आंदोलनाचा धसका ; शंकर सहकारी ३०२५/-रु. पहिली उचल जाहीर

आंदोलनाचा धसका ; शंकर सहकारी ३०२५/-रु. पहिली उचल जाहीर
३०००/-रु.पहिली उचल देण्यास भाग पाडल्याने हा खरा स्वाभिमानी संघटनेचा विजय ; अजित बोरकर
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील ज्या कारखान्यांनी अजून ३०००/- भाव दिला नाही. त्या ठिकाणी गव्हाणीत उड्या मारून कारखाने बंद करायचे आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, ज्येष्ठ नेते मगन काळे, भानुदास सालगुडे पाटील,अमरसिंह माने देशमुख, सचिन शेंडगे, राहुल ढेरे, गोपाळ घाडगे, राहुल बिडवे, दत्ता भोसले, दीपक सावंत, कमलाकर माने देशमुख, मदन जाधव ई. व त्यांच्या सहकार्याने घेतली होती. याचाच धसका घेऊन अखेर शंकर सहकारी कारखान्याने पहिला हप्ता ३०२५/- रु. जाहीर केला. तालुक्यातील कारखान्यांना पहिली उचल ३०००/ रु.देण्यास भाग पाडल्याने हा खरा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असल्याचे अजित बोरकर यांनी सांगितले.




