अकलूज नगरपरिषदेच्या नूतन नगरसेवकांना नगरपरिषदेत जाण्याचा चांगला मुहूर्त सापडेना ?

अकलूज नगरपरिषदेच्या नूतन नगरसेवकांना नगरपरिषदेत जाण्याचा चांगला मुहूर्त सापडेना ?
पहिला उपनगराध्यक्ष कोण उत्सुकता शिगेला
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगरपरिषदेची निवडणूकीचा निकाल होवून दहा दिवस उलटून गेले व इंग्रजी वर्ष सरायला लागले तरी नवीन नगरसेवक निवडून येवून सुध्दा नगरपरिषदेकडे फिरकायला तयार नाही आहेत.त्यामुळे नगरपरिषदेचा कारभार अजून प्रशासकीय कार्यकाळ असल्यासारखे अकलूजच्या जनतेला वाटत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूज ग्रामपंचायतीला संबोधले जात होते.१९३२ साली अकलूज ग्रामपंचायतीची स्थापन झाली होती.त्यावेळी आठ वाड्यावस्तींचा समावेश या ग्रामपंचायतीमध्ये होता पुढे लोकसंख्या वाढू लागल्यामुळे आठ वाड्यावस्तीचे रूपांतर वेगवेळ्या ग्रामपंचायतीत करण्यात आले होते.ऐंशी नव्वदच्या दशकात अकलूज ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळणार होता.पण जनतेला विविध करांचा सामना करायला लागणार असल्यामुळे त्यावेळेस राजकीय नेत्यांनी व अकलूजकरांनी नगरपरिषदेला विरोध केला होता.९९ वर्षांच्या अस्तित्वानंतर अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर अकलूज नगरपरिषदेत झाले.काही तांत्रिक व कायदेशीर आडचणीच्या कारणामुळे तीन चार वर्ष अकलूज नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक होवू शकली नाही.त्यामुळे तीन चार वर्ष प्रशासकीय कार्यकाळ राहीला होता.गेल्या नोव्हेंबर निवडणूक तारखा जाहीर होवून दोन डिसेंबरला मतदार होवून २१ डिसेंबर निकाल लागला आहे.निवडून आलेल्या नगरसेवकांनी जनतेचे आभार मानायचे राहीलेच तर गल्लीबोळात सत्कार स्विकारताना दिसून येत आहे.तर काही नगरसेवकांनी चौका चौकात आपले डिजीटल बोर्ड उभे करून आपण किती निष्ठावंत कार्यकर्ता आहे हे दाखवण्यात मग्न आहेत.तर काही नगरसेवकांनी व्हाट्सअपचा व फेसबुकचा सहारा घेवून सतत प्रसिद्ध झोतात रहात आहेत.
निवडून आलेल्या नगरसेवकांकडून अकलूजच्या जनतेच्या असलेल्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात व नगरपरिषदेच्या विविध करांच्या व त्यावरील आकारण्यात येणा-या व्याजातून अकलूजकरांना मुक्त करावे हि मागणी जनतेतून जोर धरत आहे.



