solapur

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानभवनावर आंदोलन

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानभवनावर आंदोलन

संचार वृत्त अपडेट

राज्य सरकारने कालच्या अर्थसंकल्पात संपुर्ण कर्जमुकतीचे दिलेले आश्वासन पाळले नाही . राज्यातील तूर , कापूस , सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारच्या धोरणामुळे कोणत्याच पिकाला हमीभाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर तूर , कांदा , सोयाबीन , कापूस फेकून आंदोलन करण्यात आले.

राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई येथील विधानभवन परिसरात दाखल झाले. अधिवेशन सुरू असल्याने यावेळी विधानभवन परिसरात प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामधूनही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीच्या घोषणा देत गनिमी कावा करत थेट विधानभवनावर कारखान्याकडील थकीत एफ, आर,पी,रक्कम,तूर , कांदा , कापूस व सोयाबीन फेकत आंदोलन केले.यावेळी विधानभवन परिसरातील पेलिसांनी कार्यकर्त्याना धक्काबुक्की करत ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलिस स्टेशनकडे रवाना झाले. प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही स्वाभिमीनीने विधानभवनावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला.यावेळी दामोदर इंगोले , किशोर ढगे , प्रकाश तात्या बालवडकर , अमर कदम , रवि मोरे , अजित बोरकर , निवृत्ती गारे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa