
बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी झाल्या आहेत:विक्रम साळुंखे
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
महिला व बालविकास विभागा अंतर्गत,महिला आर्थिक विकास महामंडळ,सोलापूर अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत सोमनाथ लामगुंडे जिल्हा समन्वय अधिकारी माविम सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरणा करिता पुरुषांचा सहभाग यामध्ये जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवार्ड पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन यशवंतनगरच्या सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र या संस्थानच्या मार्फत कार्यक्षेत्रातील जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल म्हणून काम केलेल्या पुरुषांचा सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, माळशिरस तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजीत शेंडे, माळशिरस तालुका उपजिविका विकास सल्लागार उमेश जाधव सीएमआरसीच्या अध्यक्षा जयश्री एकतपुरे,सचिव राजश्री जाधव व शंकरनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा सरतापे,पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग जाधव व राजेश कांबळे यांनी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून दिप प्रज्वलन करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये विक्रम साळुंखे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सहाय्य घेऊन विविध व्यवसाय करत त्यांची आर्थिक प्रगती झाली असून त्या स्वावलंबी झाल्या आहेत.याबद्दल माविमच्या कामाचे व या कार्यक्रमाचे कौतुक केले व निवडलेल्या माविम मित्र मंडळ यांनी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. माविम मार्फत महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याच परंतु परतफेड १००% करत असल्यामुळे पण महिलांना मानाचे स्थान समाजात मिळाले ही बाब कौतुकस्पद आहे. समाजात महिलांना काम करत असताना पुरुषांनी सहकार्य करावे.असे म्हटले तसेच या कार्यक्रमासाठी बचत गटातील १५० महिला उपस्थितीत होत्या. या कार्यक्रमांमध्ये एकूण २४ ग्रामसंघातील २४ पुरुषांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
यावेळी जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवार्ड पुरस्कार प्राप्त माविम मित्र मंडळ दशरथ नवगिरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा पाटील व्यवस्थापक सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र व प्रास्ताविक तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजीत शेंडे यांनी केले.यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता एलडीसी आकाश लोंढे,सीएमआरसी लेखापाल सविता क्षीरसागर,क्षेत्र समन्व्यक रिजवाना शेख,वैशाली कांबळे मनिषा गवळी,सीआरपी व कार्यकारणी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.