कर्मयोगी’च्या कामगारांचा पगार, ‘एफआरपी’ थकली भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता

‘कर्मयोगी’च्या कामगारांचा पगार, ‘एफआरपी’ थकली भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता
संचार वृत्त अपडेट
बिजवडी (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे ५ ते ६ महिन्यांचे पगार रखडले आहेत. कारखाना प्रशासनास अर्ज विनंत्या करूनही पगार होत नसल्याने कामगारांच्या भावनांचा उद्रेक होऊन आठ दिवसांत दोन बैठका पार पडलेल्या आहेत. प्रशासनाने दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास कामगारांमध्ये मोठा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कामगारांचे वेतन रखडल्यामुळे त्यांच्याबर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कामगारांच्या, अधिकाऱ्यांच्या पत्नी शेतामध्ये तसेच लोणी देवकर येथील एमआयडीसीतील कंपनीमध्ये रोजंदारीवर कामाला जात असल्याचे कामगारांनी सांगितले. कारखाना कर्मचाऱ्यांनी बिजवडी येथील मंदिरामध्ये बैठक घेऊन आपल्या भावनांचा उद्रेक मांडला. या वेळी अडीचशे ते तीनशे कर्मचारी उपस्थित होते. आठ दिवसांपूवी रुई बाबीर येथे देखील कर्मचान्यांची बैठक पार पडली होती, कारखान्याचे यंदाचे गाळप खूपच कमी झाल्यामुळे कारखान्यासमोर आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ रक्कम देणे देखील बाकी असल्याने शेतकरी देखील अडचणीत आलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी गाळपास दिलेल्या ऊसबिलापोटी अॅडव्हान्स मिळावा म्हणून कारखान्याकडे अर्ज केलेले आहेत. त्यावर देखील कारखाना प्रशासन विचार करत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. चैत्र महिन्यातील गावोगावचे यात्रा उत्सव सुरू आहेत. ऊसबिलाचे पैसे मिळाले नसल्यामुळे उत्सवात सहभागी होता येत नसल्याचे काही शेतकरी, कामगार सांगत आहेत, अनेकांना हॉस्पिटलसाठी, मुलांच्या शैक्षणिक कारणासाठी पैशाची गरज असताना ऊत्सबिलाचे पैसे मिळत नसल्याने कर्मयोगी साखर कारखान्यास ऊस गाळपास दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण शाली आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी देखील राजीनामा दिल्याने कारखाना प्रशासन, अध्यक्ष, संचालक मंडळ कामगारांचे पगार व थकीत ‘एफआरपी’बाबत काय निर्णय येणार व चकीत पैसे कामगारांना व शेतकऱ्यांना कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्मयोगी’चे कामगार कामाच्या शोधात !
कायम कामगारांना देखील सक्तीच्या रजेवर तसेच काही कामगारांना कामामध्ये ‘ब्रेक’ दिल्यामुळे हे कामगार कामाच्या शोधात आहेत. एमआयडीसीमध्ये हेल्पर, कापड दुकान, शेतकऱ्यांवाडे रोजंदारीवर काम मिळते का, हे पाहण्यासाठी त्यांची भटकंती सुरू आहे. सध्या कामाही मिळत नाही. गेल्या सहा महिन्यांतील पगारही नाहीत, त्यामुळे ‘कोणी काम देता का काम’, असे माणत भटकंती करण्याची वेळ कर्मयोगी साखर कारखान्याच्या कामगारांवर आली आहे.