solapur

सामाजिक बांधिलकी जपत वाघमोडे परिवाराने सैनिकांना पाठवल्या राख्या

रक्षाबंधन सणासाठी सीमेवरील जवानांसाठी राख्या रवाना.

महिला पत्रकार सौ.शोभा वाघमोडे व त्यांचे संपूर्ण परिवार गेली सहा हा वर्षे उपक्रम राबवित आहेत.

संचार वृत्त अपडेट 

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरसच्या वाघमोडे परिवाराने रक्षाबंधन सणासाठी सीमेवरील जवानांना पाठविलेल्या साडेपाच हजार राख्यांचा उपक्रम स्तुत्यपर असून सैनिका प्रति त्यांची श्रद्धा,प्रेम व आपुलकी दिसून येत आहे.तसेच माळशिरस महसूल विभागात सैनिकांच्या कामकाजासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल असे प्रांताधिकारी विजया पांगरकर यांनी सांगितले.त्यांच्या हस्ते आज जवानांसाठीच्या राख्या पाठविण्यात आल्या.


सीमेवर सैनिक तैनात असतात म्हणून संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतो.सैनिक म्हटले की आपल्या शरीरात अद्भुत शक्तीचा संचार निर्माण होतो.आपल्या प्राणाची परवा न करता सैनिक अहोरात्र आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभा आहे. सण असो वा उत्सव असो देशसेवा हाच आपला मोठा सण मानणाऱ्या सैनिक बांधव सैनिक बांधवांच्या योगदानाची जाणीव ठेवून आपण ही त्यांच्या स्नेह जपायला हवा.त्यांनी ही देशातील बहिणींची मायेचा प्रेमळ ओलावा अनुभवता यावा या जाणिवेतून वाघमोडे परिवाराने”एक राखी सैनिकांसाठी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणून माळशिरस येथील तानाजी वाघमोडे व शोभा वाघमोडे व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या हाताने तिरंगा कलर मध्ये राख्या तयार करून आपल्या भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना पाठविण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला.
याही वर्षी प्रेमाचे प्रतीक असलेले राखी देशातील ३५ युनिट मधील जवानांना साडेपाच हजार राख्या पाठविल्या आहेत.
वाघमोडे कुटुंबाच्या उपक्रमाचे कौतुक केले घरची परिस्थिती साधारण असूनही सैनिका प्रति भावना जपत आहे.तसेच तालुक्यातील प्रत्येक घरातून एक राखी सैनिकांसाठी गोळा केली तर लाखो राख्या माळशिरस तालुक्यातून सीमेवरील सैनिकांना पोहोचतील असे त्यांनी मत व्यक्त केले. सैनिकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रघुनाथ पांढरे कार्यालयात असून हि या कार्यक्रमाला दांडी मारली.
या कार्यक्रमाला माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडूरे एपीआय जानकर,राया ऍग्रोचे मालक शिवाजी गोरड,त्रिदल माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष मेजर राजेंद्र आढाव, ज्येष्ठ सैनिक अधिकारी कप्तान लक्ष्मण माने,सैनिक संघटना तालुका अध्यक्ष नायब सुभेदार सुरेश तोरसे,माजी सैनिक अधिकारी सुभेदार राजू खराडे, सैनिक मित्र सोलापूर एसपी ऑफिस सुभेदार विजयकुमार सावंत,माजी सैनिक मारुती वाघमोडे,बापू वाघमोडे,रत्नप्रभा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर,रत्नप्रभादेवी बिजो.सह.संस्थेचे उपाध्यक्ष सूजित तरंगे,बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील, पत्रकार आनंद शेंडगे,संजय हुलगे,स्वप्निल राऊत,शिवाजी पालवे,कृष्णा लावंड,एडवोकेट रूपाली गोरे,गोफने मॅडम, वाघमोडे परिवार तसेच माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर सावता गोरे यांनी केले तर आभार सुभेदार विजयकुमार सावंत यांनी मानले.

“एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमांतर्गत सैनिकांना तिरंगा कलर मध्ये स्वतःच्या हाताने राख्या तयार करून पाठवीत असतो. हा उपक्रम कोरोना काळापासून सुरू करण्यात आला.कोरोना काळात सर्व जग एका जागी स्थिर असताना केवळ सीमेवरील सैनिक,पोलीस प्रशासन,डॉक्टर,नर्स,केमिस्ट अहोरात्र आपले कर्तव्य बजावत होते.आपण सर्वजण प्रत्येक सण आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदात साजरा करत असतो परंतु सीमेवरील जवानांना कोणतेही सण आपल्या कुटुंबासोबत साजरे करता येत नाही.आपल्या देशातील भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण “रक्षाबंधन” हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो .”रक्षाबंधन” म्हणजे भावाने बहिणीचे रक्षण करणे. परंतु आपल्या भारत मातेचे खरे रक्षणकर्ते सीमेवरील लढणारे सैनिक आहेत म्हणजे रक्षाबंधन या सणाचे खरे मानकरी तर सीमेवरील सैनिक आहेत . आपण सैनिकांना सीमेवर राख्या पाठवायच्या का ? ही गोष्ट मी कुटुंबासोबत शेअर केली असता संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले. सुरुवातीला केवळ ५०० राख्या तयार केल्या होत्या व पाच युनिटला राख्या पाठविण्यात आल्या होत्या.दरवर्षी त्यात वाढ करून यावर्षी म्हणजे २०२५ मध्ये ५,५०० राख्या तयार करण्यात आल्या व जवळपास ३५ युनिटला या राख्या पाठवण्यात आल्या आहेत राख्या पाठवण्याचे हे ६ वे वर्ष आहे. राख्या मिळाल्यानंतर जवानांच्या आलेल्या प्रतिक्रिया खरच मानसिक समाधान मिळवून देते. यापुढेही माझ्याकडून हे काम चालूच राहील असे ईश्वरचरणी प्रार्थना करते.

शोभा तानाजी वाघमोडे (पत्रकार,समाजसेविका,
माळशिरस)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button