महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ हॉस्पिटल ने नाकारला कारवाईची मागणी

महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ नाकारला; डॉक्टरांच्या टाळाटाळीने रुग्ण संकटात..माळशिरस तालुका न्याय हक्क परिषदेची कारवाईची मागणी
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुका रुग्ण न्याय हक्क परिषदेच्यावतीने कळविण्यात येते की, महिंद्रा अजिनाथ बनसोडे या रुग्णाकडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सर्व आवश्यक दस्तऐवज असूनही कदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकलूज, अकलूज क्रिटिकल केअर व ट्रॉमा सेंटर आणि स्टार आय.सी.यू अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल माळशिरस या रुग्णालयांनी रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ केली.
रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असून, तो अत्यंत गरिब कुटुंबातून आलेला आहे.अशा वेळी शासकीय योजनेचा लाभ देण्याऐवजी डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवून रुग्णाच्या हक्कावर गदा आणली आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून, गरीब व गरजू रुग्णांना योजनांचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण करणारी आहे.
आरोग्य हा मूलभूत हक्क असून तो कोणत्याही आर्थिक अडचणींवर आधारित नसावा, यासाठी शासन विविध योजना राबवते. रुग्णांच्या सनदीनुसार आपत्कालीन रुग्णाला तात्काळ उपचार दिले जातात परंतु या ठिकाणी दिले गेले नाहीत.मात्र,अशा योजना अंमलात आणणाऱ्या रुग्णालयांची उदासीनता ही समाजाच्या आरोग्य हक्कावर घाला आहे. या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी माळशिरस तालुका रुग्ण न्याय हक्क परिषदेच्या वतीने उपविभागीय कार्यालय व आरोग्य विभागातील सर्व विभागांना निवेदन देण्यात आले.यावेळी माळशिरस तालुक्याचे आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे, मिलिंद सरतापे, काकासाहेब जाधव, अमोल माने, सौरभ वाघमारे, तुषार केंगार, राहुल लोंढे, सुहास गायकवाड, अजित साठे, सुजित सातपुते, आबासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.
सदर निवेदनाची दखल तात्काळ न घेतल्यास आणि कारवाई न झाल्यास, दिनांक ०८ मे रोजी प्रांत कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माळशिरस तालुका रुग्ण न्याय हक्क परिषदेच्यावतीने देण्यात येत आहे.
महेश शिंदे (सामाजिक कार्यकर्ते)