
ऊस दर जाहीर करा ; अन्यथा आंदोलन करु
राष्ट्रवादी (शरद पवार) किसान सेल ची मागणी
संचार वृत्त अपडेट
गाळप हंगाम २०२५/२६ सुरू झाला आहे. साखर कारखान्यांनी बॉयलर पेटवून मोळी पूजन केले आहे परंतु एकाही साखर कारखान्याने येणाऱ्या गाळप हंगामातील उसासाठी एफ आर पी किंवा ऊस दर जाहीर केलेला नाही.
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत.कारखानदारांनी अगोदर ऊस दर जाहीर करावा मगच साखर कारखाने सुरू करावेत.
अन्यथा तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा कमलाकर माने देशमुख (प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार किसान शेल) व मदन सिंह जाधव (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किसान सेल) यांनी माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील कारखान्यांना दिला आहे याबाबत माळशिरस तालुक्यातील ओंकार, सहकार महर्षी,शंकर सहकारी,सासवड माळी, पांडुरंग सहकारी, तसेच पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी, माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे या सर्व कारखान्यांच्या प्रशासनास निवेदन देऊन दर जाहीर करण्याची मागणी केली आहे.
यावर्षी सतत पाऊस पडल्यामुळे ऊसाची वाढ योग्य प्रमाणात झाली नाही परिणामी उसाचे एकरी उत्पादन घटले आहे.
ऊस क्षेत्र कमी असल्यामुळे साखर कारखाने तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस चालणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला पाठवण्याची घाई करू नये.
जे कारखाने ऊस दर जाहीर करतील त्यांनाच ऊस देण्याचे आव्हान कमलाकर माने देशमुख व मदन सिंह जाधव यांनी केले आहे.



