solapur

दसरा महोत्सव राज्यस्तरीय गजीढोल स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न

जनसेवा संघटनेने घडवले पारंपारिक वाद्य गजीढोलचे दर्शन

दसरा महोत्सव राज्यस्तरीय गजीढोल स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न

संचार वृत्त अपडेट 

संग्रामनगर (केदार लोहकरे)
महाराष्ट्र जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या माध्यमातुन, आयोजित केलेल्या गजीढोल स्पर्धेला,अकलूज येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला असून दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर गजीढोल खेळाचे आयोजन करून दसरा उत्सवात आनंदाचा योग आणला असल्याचे गजीढोल प्रेमी म्हणाले.
अकलूज येथील धनश्री नगर,धवल श्रीराम मंदिराच्या भव्य प्रांगणात,महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने दसरा महोत्सव राज्यस्तरीय गजीढोल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत २३ संघांनी सहभाग घेतला होता.प्रत्येक संघात किमान २५ खेळाडू सहभागी झाले होते.प्रत्येक संघाला ३० मिनिटाची वेळ, सादरीकरण करण्यासाठी देण्यात आली होती.सदर महोत्सवाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील, कु.ईलाक्षीराजे धवलसिंह मोहिते-पाटील,चि.निहानसिंह धवलसिंह मोहिते पाटील, माणिकराव मिसाळ,अण्णासाहेब इनामदार,अण्णासाहेब शिंदे,सतीश पालकर, हिंदुराव माने पाटील, विकास शिंदे,सुधीर रास्ते,मयुर माने,नवनाथ साठे,रणजित देशमुख,शशिकांत माने-पाटील,सोमनाथ वाघमोडे, सोनू पराडे,त्रिभुवन धाईंजे उपस्थित होते.या महोत्सवाचे परीक्षण लक्ष्मण पवार,आबा पांढरे,शेखर मगर, सर्जेराव मगर,माउली कुलाळ,दादा माने यांनी केले.तर सांगता रावण दहनाने व रंगीत फटाक्यांची आतषबाजीने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button