कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांनी साजरी

कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांनी साजरी
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे)
माळशिरस पंचायत समितीचे पहिले सभापती गोरगरिबांचे कैवारी कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची ५८ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली.
विजयचौक येथील स्वर्गीय बाबासाहेब माने पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज सकाळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून आजरांजली वाहण्यात आली.यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील,माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,शिवतेजसिंह मोहिते पाटील,सतीश माने पाटील, सुजयसिंह माने पाटील,विक्रमसिंह माने यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विनोदकुमार दोशी व त्यांचे सर्व सहकारी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कुंभार व त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल गायकवाड सदस्य त्र्यंबक गुळवे सौ रेश्मा गायकवाड बंटी जगताप श्री साईबाबा सेवा ट्रस्टचे सर्व सदस्य लोकमान्य व शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य उपस्थितीत होते.