अकलूज मध्ये वेगवेगळ्या भागातून संचलन पथसंचलनातून संघसाधना अन् राष्ट्रभक्तीची प्रेरणा

अकलूज मध्ये वेगवेगळ्या भागातून संचलन
पथसंचलनातून संघसाधना अन् राष्ट्रभक्तीची प्रेरणा
संचार वृत्त अपडेट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दीनिमित्त आज रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी संघदृष्ट्या सात नगरातील स्वयंसेवकांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. या संचलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशक्तीचे दर्शन झाले.
पथसंचलनातून शंभर वर्षांची लॉट, संघसाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा नागरिकांनी अनुभवली. स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर शिस्तबध्द पध्दतीने विविध मार्गावरून पथसंचलनाद्वारे देशभक्तीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.शहरातील विविध मार्गावरून संघाची शिस्त, एकजूट, राष्ट्रनिष्ठा याचे दर्शन या संचलनाच्या माध्यमातून नागरिकांना घडले. मध्यभागी चार ध्वजरक्षक स्वयंसेवकांसह मध्यभागी भगवा ध्वज त्यापुढे व पाठीमागे स्वयंसेवकांच्या तुकड्या (वाहिनी)
पंचसूत्री संदेश
शताब्दीनिमित्त संचलनाद्वारे सामाजिक बांधिलकी व मूल्यांचा प्रसार देशातील शेवटच्या घटकांपर्यंत करण्यास सुरुवात झाली आहे. यातून सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीबाबत आगामी काळात कर्तव्य करण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक स्वयंसेवकाने आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून समाज परिवर्तनाचे काम करावे, हा या संचलनाचा मुख्य संदेश विविध वक्त्यांनी उत्सवात मांडला.असा पथसंचलनाचा साज होता. संघ स्थापनेच्या शताब्दीनिमित्त पंचसूत्री कार्यक्रमांची सुरुवात या संचलनापासून झाली. खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट या गणवेशातील
स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतला.
संचलन मार्गावर दोन्ही बाजूंनी उभे असलेल्या नागरिकांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून या संचलनाला आपला पाठिंबा दर्शवला. देशभक्तिमय वातावरणात पथसंचलन व उत्सव दोन्ही पार पडले. यावेळी 350 स्वयंसेवकांनी भाग घेतला
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज श्री बापूसाहेब मोरे देहूकर महाराज पंढरपूर ,जिल्हा सहकार्य वाह श्री योगेश शामराव कुलकर्णी, पंढरपूर जिल्हा कार्यवाह श्री प्रतापसिंह बाबुराव टकले ,माळशिरस तालुका संघ चालक भीष्माचार्य केरबा कुदळे, तालुका कार्यवाह बाळासाहेब खरात ,तसेच माजी आमदार राम सातपुते यांनी सहभाग घेतला.
तसेच या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी पंढरपूर जिल्हा सहकार्य वाह श्री योगेश शामराव कुलकर्णी यांचे बौद्धिक झाले तसेच यावेळी शस्त्र पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा समारोप.नामदेव मंगल कार्यालय येथे पार पडला.