solapur
माळेवाडीत पुढारी झाले साठ…अन्…रस्त्याची लागली वाट…!

माळेवाडीत पुढारी झाले साठ…अन्…रस्त्याची लागली वाट…!
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगरपरिषदेमध्ये माळेवाडी (अ) गावाचा चार वर्षापुर्वी समावेश करण्यात आला होता.त्यानंतर तेथील नागरिकांना कोणत्याच सुखसोयी व सुविधा उपलब्ध झालेल्या नाही आहेत.ना गटारीची सोय,ना रस्त्यावर लाईट,ना गावामध्ये रस्ते आहे.त्यामुळे माळेवाडीतील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झालेले आहेत.वरील अकलूज वेळापूर रस्त्यावरील विद्यानगर येथे गटारी नसल्यामुळे गटारीचे पाणी चक्क रस्त्यावरून वहात असल्यामुळे वहान चालवताना चालकांना व नागरिकांना त्रास होवू लागला आहे.माळेवाडीत पुढारी झाले साठ…अन्…रस्त्याची लागली वाट…अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे
अमित टिळेकर (भाजप सक्रिय कार्यकर्ते)



