स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली संघर्षाची धग वाढल्याने कारखाने चालवण्यास अडचणी वाढणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली
संघर्षाची धग वाढल्याने कारखाने चालवण्यास अडचणी वाढणार
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यासह, इतर जिल्ह्यातील कारखान्याने अद्याप उसाचा दर जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे-पंढरपूर,पिलिव-निमगाव मार्गावर ट्रॅक्टर अडवून ऊस वाहतूक रोखली
ऊस दर निश्चित होईपर्यंत कोणत्याही कारखान्याकडे ऊस वाहतूक होऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती अजित बोरकर म्हणाले संपूर्ण राज्यातील कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला असून काही कारखान्यांनी पहिला हप्ता देण्यासाठी सुरुवात केली आहे मात्र माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्यांनी अजूनही दर निश्चित केलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे दर न जाहीर झाल्यास कारखान्याचे प्रवेशद्वारच बंद करू असा इशारा दिला.ऊस दराच्या मुद्द्यावर संघटना व कारखानदारात एकमत कधी होणार? संघर्षाची धग वाढू नये यासाठी एक पाऊल कुणीतरी मागे घ्यावे असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे आंदोलनामुळे ऊस वाहतुकीसाठी अडचणी येणार असून धुराडे पेटून सुद्धा ऊस वाहतूक रोखल्याने कारखाने चालवण्यास मोठे अडचण निर्माण होणार आहे. काही दिवसापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माळशिरस तालुक्यातील सर्व कारखान्यांना पहिली उचल जाहीर करा अन्यथा आंदोलनाची धग वाढविणार असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.

सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यामुळे सहकार मोठा झाला कारखाने मोठे झाले कारखानदारीच्या जीवावर कारखानदाराचे राजकारण सुरू आहे मात्र हेच कारखानदार उसाला दर देत नाहीत कोणतेही प्रकल्प नसताना खाजगी कारखाना जास्त दर देतो तर मग सहकारी कारखाने दरात का मागे राहत आहेत त्यांनी तर ४००० रुपये दर द्यायला पाहिजे
अजित बोरकर
तालुकाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना



