स्वाभिमानीला मोठे बळ; बोरकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश

स्वाभिमानीला मोठे बळ; बोरकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश
संघटनेची ताकद वाढली;आगामी आंदोलनाला मिळणार बळ
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढली आहे. शेतकरी नेते अजित बोरकर यांच्या आक्रमक व लढाऊ नेतृत्वावर विश्वास ठेवत जनशक्ती शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला.
माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अजित बोरकर यांनी ऊसदर, थकीत ऊस बिले, वीज, पाणी, दूध दरवाढ यासह विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने उभी केली आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आपण स्वाभिमानीत प्रवेश करत असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नुकतेच तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांना ऊसदराच्या दुसऱ्या हप्त्यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, आगामी काळात माळशिरस तालुक्यात शेतकरी प्रश्नांवर संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. या इनकमिंगमुळे माळशिरस तालुक्यातील शेतकरी आंदोलनाला मोठे बळ मिळणार आहे.
यावेळी सुनील मुंडफणे-पाटील – तालुकाध्यक्ष, जनशक्ती शेतकरी संघटना,सुरेश वाघमारे,पांडुरंग भोसले,माऊली केंगार यांनी व त्यांच्या सहकार्यानी जाहीर प्रवेश केला.या प्रवेश सोहळ्यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन कार्यकर्त्यांचे फेटा व पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



