अकलूज पाणी कपात ;पाटबंधारे विभागाच्या दिरंगाईचा फटका आता तीन दिवसांनी येणार पाणी

अकलूज पाणी कपात ;पाटबंधारे विभागाच्या दिरंगाईचा फटका आता तीन दिवसांनी येणार पाणी
पाणीपुरवठा कोलमडला
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
पाटबंधारे विभागाकडून अकलूजच्या साठवण तलावात पाणी उशिरा सोडले जाणार असल्याने शहरवासीयांना आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी अकलूज नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठा ३ दिवसांआड करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार दि.१८ आणि बुधवार दि. १९ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने हे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.
पाटबंधारे विभागाकडून अकलूजच्या साठवण तलावात पाणी उशिरा सोडले जाणार असल्याने शहरवासीयांना आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी अकलूज नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठा ३ दिवसांआड करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार दि.१८आणि बुधवार दि. १९ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने हे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी.असे आव्हान पाटील यांनी केले आहे



