
धवल श्रीराम मंदिरात रंगला नागपंचमी महोत्सव !
महिलांनी गाजवला मंच
पैठणीची मानकरी कादंबरी,रीलची क्वीन वैशाली
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
सणासुदीच्या निमित्ताने महिलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने अकलूज येथील धवल श्रीराम मंदिरात दोन दिवसीय नागपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महोत्सवाचे उद्घाटन उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. तर पारितोषिक वितरण सोहळा पद्मजादेवी मोहिते पाटील आणि प्रसिद्ध रीलस्टार सारिका देवरुखकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.

महोत्सवात रांगोळी, मेहंदी, पाककला, सौंदर्यप्रसाधन, निबंध, वक्तृत्व, रीलमेकींग यासह ‘कोण होणार पैठणीची मानकरी’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपली कला सादर केली.


विजेत्यांची यादी मध्ये पैठणीची मानकरी कादंबरी सूर्यवंशी – प्रथम पारितोषिक पैठणी उपविजेता : पूजा शिंदे – सोन्याची नथ रीलमेकींग : वैशाली वाघमारे – प्रथम, शिवानी कांबळे -द्वितीय, मिनाज शेख व गौरी भोसले – विभागून तृतीयरांगोळी : कादंबरी सूर्यवंशी – प्रथम, दिव्या आदलिंगे – द्वितीय, राणी खरात – तृतीय मेहंदी : कोमल नाळे – प्रथम, दिव्या आदलिंगे – द्वितीय, वनिता पवार – तृतीय पाककला : गौरी भोसले – प्रथम, शितल ताम्हाणे – द्वितीय, नसरीन बागवान – तृतीय मेकअप : अफसाना मुलाणी – प्रथम, अमृता जगताप – द्वितीय, स्वप्नाली घोगरे – तृतीय निबंध : रुपाली पताळे – प्रथम, क्रांती कानडे – द्वितीय, वैशाली सुळे व जयश्री गोडसे – विभागून तृतीय वक्तृत्व : चैताली भंडारे – प्रथम, क्रांती कानडे – द्वितीय, वनिता पवार – तृतीय स्पर्धेचे परीक्षण वर्षा माने, उमेश शिंदे, आर जे बंड्या, पूजा झांबरे, राम देवरुखकर, ज्योती कुंभार यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महोत्सवामुळे महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. सर्व विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



