solapur

यशवंतनगर-संग्रामनगरची जलजीवन योजना कासवगतीने !

यशवंतनगर-संग्रामनगरची जलजीवन योजना कासवगतीने !

४० वर्षांपासून अकलूजच्या पाण्यावर अवलंबून, स्वतंत्र योजना मात्र अजूनही कागदावरच!

संचार वृत्त अपडेट  (लक्ष्मीकांत कुरुडकर)

यशवंतनगर व संग्रामनगर या दोन ग्रामपंचायतींच्या नवीन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना शासनाच्या १० कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे कासवगतीने सुरू असून, योजना पूर्ण होण्यास मोठा विलंब होणार आहे. त्यामुळे दोन्ही गावांना अजूनही अकलूज नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.माळशिरस तालुक्यात यशवंतनगर ग्रामपंचायत सन १९८५ साली, तर संग्रामनगर ग्रामपंचायत १९९३ साली अस्तित्वात आली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल ४० वर्षे दोन्ही गावांचा पाणीपुरवठा अकलूजवरच अवलंबून आहे. लोकसंख्या आणि विस्तार वाढीमुळे अकलूजला देखील पाण्याची टंचाई भासत आहे.<span;>केंद्र शासन ५० टक्के व राज्य शासन ५० टक्के निधी असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत या दोन्ही योजनांचे टेंडर २०२२ साली पूर्ण झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १० नोव्हेंबर २०२२ रोजी गुजरातच्या एन.आर.आय.पी.एल. कंपनीला काम दिले. जिल्हाधिकाऱ्यांकडून १४ मार्च २०२४ रोजी जागेची परवानगी मिळाल्यानंतर ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढीव मुदतीसह काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

खुडूस हद्दीत नीरा उजवा कालव्याजवळ जलशुद्धीकरण केंद्र, पंप हाऊस आणि साठवण तलावाचे काम सुरू आहे. परंतु गेल्या ५ महिन्यांपासून १० कोटींचा निधी थकल्याने कंपनीचा कामाचा वेग मंदावला आहे.यशवंतनगर योजना ४६ .९८ ,संग्राम नगर ३३.५१ कोटी ची असून मंजुरी  दिनांक १०/११/२०२२ ची आहे सरासरी ४० टक्के काम बाकी असताना उर्वरित ४ महिन्यांत काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे चित्र आहे. निधी न मिळाल्याने ही योजना दीर्घकाळ रखडणार असून भविष्यात तिन्ही गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दोन्ही ग्रामपंचायतींना स्वतंत्र पाणीपुरवठा मिळावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.जलजीवन मिशन की जल-जोखीम मिशन ?“नाव जलजीवन, पण आमच्या जीवनात पाण्यासाठी अजूनही वणवण. ३१ डिसेंबरची मुदत संपली की पुन्हा नवी मुदतवाढ देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.५० टक्के पैसे वेळेवर आले. बाकीचे अडकले म्हणून दोन गावांची तहान अडकली. हा निष्काळजीपणा नाही तर यशवंतनगर-संग्रामनगरच्या जनतेच्या तोंडचे पाणी पळवण्याचा प्रकार आहे.”जलजीवन मिशनच्या नावाखाली जल-मरण यातना सुरू आहेत. ४० वर्षे अकलूजच्या जिवावर पाणी पिणाऱ्या जनतेला आता तरी न्याय द्या.  डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण झालंच पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.५४ टक्के आणि ६४ टक्के झालंय, पण पैसा फक्त ३४ टक्के दिला. हे गणितच चुकीचं आहे. यशवंतनगर आणि संग्रामनगरच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार ? तिन्ही गावांची लोकसंख्या दुप्पट झाली, पाणी तेच आहे. उद्या अकलूजने पाणी तोडलं तर आम्ही जायचं कुठं? निधि नाही म्हणून काम बंद आहे. मग आमच्याकडून पाणीपट्टी, घरपट्टी मात्र वेळेवर वसूल करता? जनतेच्या तहानेशी खेळू नये अश्यासंतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button