solapur
खरंच राजीनामा देणार की काय…

खरंच राजीनामा देणार की काय…
संचार वृत्त अपडेट
विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरुद्ध बॅलेट अशी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर कायम चर्चेत राहत आहेत. मारकवाडीचा विषय शांत झाल्यानंतर आता जानकरांनी राजीनामास्त्र काढल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. २३ जानेवारीला जंतरमंतरमध्ये आंदोलनास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाला पत्र लिहून राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडून आल्यापासून राजीनामा देण्याची भाषा करीत आहेत. आमदारकीची शपथ उशिराने घेतली. त्यामुळे उत्तम जानकर खरंच राजीनामा देतील का, अशी कुजबुज आता कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातच नव्हे राज्यात ते चर्चेत आले आहेत.