श्री स्वयंभू गणेश मंदिर गणेशगाव येथे गणेश यागाचे आयोजन

श्री स्वयंभू गणेश मंदिर गणेशगाव येथे गणेश यागाचे आयोजन
संचार वृत्त अपडेट
गणेश गाव (ता.माळशिरस) येथे ह.भ.प श्री अंकुश महाराज रणखांबे गिरवीकर यांच्या आशीर्वादाने गणेश जयंती निमित्त श्री गणेश यागाचे माघ शु.४ शनिवार दि.०१/०२/२०२५ रोजी श्री स्वयंभू गणेश मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक भक्तांनी श्री गणेश याग दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास विजयसिंह मोहिते पाटील (माजी खासदार व माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), रणजितसिंह मोहिते पाटील (सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य), धैर्यशील मोहिते पाटील (खासदार),मदनसिंह मोहिते पाटील (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज), उत्तमराव जानकर (आमदार माळशिरस विधानसभा), संग्रामसिंह मोहिते पाटील (अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज), अर्जुनसिंह मोहिते पाटील (मा. उपसभापती पंचायत समिती माळशिरस), स्वरूपाराणी मोहिते पाटील (अध्यक्ष प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर) शिवतेसिंह मोहिते पाटील (माजी सरपंच ग्रामपंचायत अकलूज), यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
होम हवन व पूजा-जयसिंह मोहिते पाटील व सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे तर सकाळी ७ वाजता श्रीस अभिषेक, सकाळी ९ते१२.३० श्री गणेश याग, दुपारी ३ते आगमना पर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार आहे रात्री ७ ते ९ ह भ प अंकुश महाराज रणखांबे गिरवीकर व सहकारी यांचे कीर्तन होणार आहे श्री याग ब्रह्मवृंद ह.भ.प श्री आनंद महाराज काकडे (निरा नरसिंहपूर) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
संपर्कासाठी फो.नं.
९९६०९५२८४६
९२२७९१२०४८
९८५०९४४४०१
९०११२६८००१