solapur

अकलूज निवडणुकीत भावकीचा रंग

अकलूज निवडणुकीत भावकीचा रंग

झालं गेलं विसरा आता सोबत या अशा सुरात उमेदवारांनी संवाद वाढवला

संचार वृत्त अपडेट 

अकलूज नगर परिषदेची निवडणूक जशी जवळ येत आहे तस तशी तिची दिशा, जातीय समीकरणे,आणि वैयक्तिक नातेसंबंध याकडे झुकताना दिसत आहे. झालं गेलं विसरा आता सोबत या अशा सुरात उमेदवारांनी संवाद वाढवला असून मतदारांनाही यामुळे वेगळाच भाव मिळू लागला आहे
राजकीय मुद्यापेक्षा आता कोणाची कोणाशी भावकी आहे.कोण कोणाच्या संपर्कात आहे.आणि कोण कुणाला भेटून आपलेशे करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावरच निवडणुकीची वाटचाल ठरताना दिसत आहे. काही उमेदवार जे साधारणपणे लोकांशी कमी बोलतात तेच आता मतदारांना स्वतःहून भेट देत आदराने विचारपूस करताना दिसत आहेत. अनेक मतदारांशी पूर्वीच काही कारणांनी दुरावा निर्माण झाला असला तरी आता तो विसरून जाण्याचे आवाहन उमेदवाराकडून केले जात आहे.
मतदानाचा दिवस जवळ आल्याने उमेदवारांना प्रत्येक मताचे महत्त्व जाणवू लागले असून त्यांच्या वर्तणुकीत मोठा बदल दिसतो. काही प्रभागांमध्ये बाकीचे राजकारण तीव्र झाले असून मतदारांना आपल्या महत्त्वाची जाणीव अधिक ठळकपणे होऊ लागली आहे.
उमेदवारांचा वाढलेला संवाद भेटीगाठी आणि माफीनामा यासारख्या विनंती मुळे मतदारांमध्येही चर्चांना उधान आले आहे. एकूणच अकलूज निवडणूक प्रचाराला भावकीचे आणि मतदारांच्या महत्त्वाची चांगलीच जोड मिळाली असून पुढील दोन दिवसात ही स्पर्धा आणखी रंगेल अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button