माळशिरस तालुक्यातील विनापरवाना दवाखान्यावरती कारवाई करण्याची शिवसेना (उद्धव ठाकरे)गट व शिव आरोग्य सेनेची मागणी
अकलूज(प्रतिनिधी)माळशिरस तालुका हा दवाखान्यांचा तालुका म्हणून उदयास येत आहे या तालुक्यात तालुक्यातील तसेच बाहेर तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात त्यामुळे तालुक्यातील शहरी भागात निमशेरी भागात तसेच गाव खेड्यांमध्ये ही दवाखान्यांचे जाळे वाढत चालले आहे पैसे कमवण्याच्या शर्यतीत अनेक दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रिया गृहांची निर्मिती केली गेलेली आहेत, त्यातील बहुतांश शस्त्रक्रियागृहे हे शासनाच्या नियमात न बसणारे व परवाने नसणारे आहेत त्यामुळे रुग्णांच्या जीविताशी खेळण्याची जणू स्पर्धाच या दवाखान्यांमध्ये चालली आहे शिवसेना व शिव आरोग्य सेनेच्या शिवसैनिकांनी या विरोधात आवाज उठवला होता, अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊनही त्यांच्याकडून कसलीही कारवाई झालेली नव्हती संबंधित अधिकारी याकडे पूर्णपणे डोळे झाक करून त्या विनापरवाना शस्त्रक्रिया गृह चालक डॉक्टरांना पाठीशी घालत होते. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका यांचे कडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख संतोष राऊत यांचे नेतृत्वाखाली,सोलापूर जिल्ह्याचे शल्यचिकित्सक यांना समक्ष भेटून याविषयी सविस्तर चर्चा करून या विनापरवाना हॉस्पिटल वरती व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी माळशिरस तालुका प्रमुख संतोष राऊत,ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख उमेश जाधव,अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,शिव आरोग्य सेना माळशिरस तालुका समन्वयक संजय गुंड,शिव आरोग्य सेना माळशिरस तालुका सह समन्वयक दीपक दोरकर आणि अकलूज शहर संघटक गणेश काळे व इतर अनेक शिवसैनिक उपस्थित होते.